Cotton :कापसाने ५० हजार रुपये प्रतिगाठीचा टप्पा गाठला.

Cotton : कापूस बाजारात अचानक तेजी का आली ?
आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस दरात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. मागील आठवडाभरात कापूस दर १४ टक्क्यांनी वाढले. यामुळं देशातही कापसाचे दर सुधारले. देशातील वायदे बाजारात कापसाने ५० हजार रुपये प्रतिगाठीचा टप्पा गाठला.

देशात आणि International Market mdhe कापसाचे दर (Cotton Rate) पुन्हा सुधारले. अमेरिकेचा कृषी विभाग (Department Of Agriculture United States) म्हणजेच युएसडीए आणि इंटरनॅशनल काॅटन advisories कमिटीनं (International Cotton Advisory Committee) जागतिक कापूस उत्पादन (Global Cotton Production) २०२२-२३ मध्ये कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळं कापूस दराला आधार मिळाला. Newyork Cotton Exchange मागील आठवड्याभरात कापूस दरात १४ टक्क्यांची सुधारणा होऊन १२५ सेंटचा टप्पा गाठला होता. मात्र गुरुवारी कापसाचे वायदे पुन्हा ११८ सेंट प्रतिपाऊंडवर स्थिरावले आहेत
तरी सुद्धा देशातही कापसाचे वायदे ५० हजार रुपये प्रतिगाठीवर पोचले. एक कापूस गाठ १७० किलोची असते. यंदा अमेरिकेतील कापूस पिकाला दुष्काळाचा फटका बसतोय. त्यामुळं अमेरिकेतील कापूस उत्पादन जवळपास ४० लाख गाठींनी कमी राहण्याची शक्यता युएसडीएनं व्यक्त केली. अमेरिकेची कापूस निर्यातही यंदा २५ लाख गाठींनी कमी राहण्याचा अंदाज आहे. अमेरिकेतून कापसाची निर्यात कमी झाल्यास आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची टंचाई निर्माण होऊ शकते. या काळात भारतातून कापसाला मागणी वाढेल. यंदा भारतात कापूस लागवड ५ टक्क्यांनी वाढली. मात्र पावसाचा पिकाला मोठा फटका बसतोय. महत्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये यंदा उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे सुधारल्यानंतर देशातही कापसाच्या दरात वाढ झाली. गुरुवारी कापसाचे वायदे जवळपास ५० हजार रुपये प्रतिगाठीने पार पडले. तर बाजार समित्यांमध्ये कापसाला १० हजार ३०० रुपयांचा दर मिळला. हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.

Soybean Market :
चांगल्या दराच्या अपेक्षेनं यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन मागं ठेवलं होतं. नोव्हेंबर महिन्यात दरानं ६ हजारांचा टप्पा गाठलाही. पण त्यानंतर दरात घट होत गेली.सोयाबीनमधील मंदी थांबणार की नाही?

लसणाचे दर तेजीत….

Garlic Rate High…


1. लसूण उत्पादनात आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेशात लसणाची आवक वाढली. यंदा इथं लसणाचं चांगलं उत्पादन झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. मात्र बाजारात आवक वाढल्यानं लसणाच्या दरात मोठी घट पाहायला मिळाली. लसणाला प्रतिक्विंटल किमान १०० रुपयांपासून तर २७०० रुपयांपर्यंत दर मिळतोय. मात्र दर दबावात असल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. तर महाराष्ट्रात मात्र लसणाला चांगला दर मिळतोय. सध्या ३००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलने लसणाचे व्यवहार होत आहेत. मात्र पुढील काळात मध्य प्रदेशातील मालाचा दबाव वाढून दर दबावात येऊ शकतात, असं जाणकारांनी सांगितलं.

Green chili हिरव्या मिरचीच्या दरात वाढ होण्याची शक्यता

Green Chili राज्यात सध्या हिरवी मिरची भाव खातेय. मालाची कमी उपलब्धता असल्यानं बाजारात हिरव्या मिरचीची आवक कमी होत आहे. त्यामुळं दरही चांगला मिळतोय. सध्या राज्यातील बाजारांमध्ये प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपयाने हिरव्या मिरचीचे व्यवहार होत आहेत. मिरची पिकाची स्थिती पाहता पुढील महिन्यात हिरव्या मिरचीचे दर आणखी सुधारू शकतात. तर पुढील दोन महिने मिरची पिकाला चांगले दर देणारे ठरु शकतात, असं जाणकारांनी सांगतलं. सणांच्या काळात हिरव्या मिरचीला मागणी वाढते. मात्र बदलत्या वातावरणानं पिकाचं नुकसान होतंय. त्यामुळं दर वाढतील, असा अंदाज आहे.

Leave a Comment