मॅग्नेट (MAGNET) प्रकल्पांतर्गत रोपवाटिका उभारणी व उती संवर्धन प्रयोगशाळा उभारणीसाठी

रोपवाटीका उभारणी – ६० लाख रुपये
उती संवर्धन प्रयोगशाळा उभारणी – १५० लाख रुपये


मॅग्नेट (MAGNET) प्रकल्पांतर्गत सीताफळ, पेरु, संत्री, डाळिंब, चिक्कू मोसंबी, मिरची व फुलपिके या पिकांसाठी “रोपवाटिका उभारणी (Nursery Development)” तसेच केळी, स्ट्राबेरी, पेरु, डाळिंब, फुलपिके या पिकांसाठी “उती संवर्धन प्रयोगशाळा (Tissue Culture Unit) उभारणी याबाबतच्या उपप्रकल्पांसाठी मागवण्यात येत आहे

पात्र लाभार्थी:


– शेतकरी उत्पादक संस्था (FPO),
– आत्मा प्रोत्साहित शेतकरी गट,
– महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत प्रोत्साहीत प्रभाग संघ,
– महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे प्रोत्साहीत लोकसंचलित साधन केंद्र
– शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स असोसिएशन्स
– राज्यातील कृषि विद्यापीठे व भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) सहाय्यित कृषि विज्ञान केंद्र

अर्थसहाय्य


पात्र लाभार्थीना प्रकल्प किमतीच्या अधिकतम ६०% पर्यंत किंवा खालीलपैकी जे कमी असेल ते अर्थसहाय्य देय राहील:
– ४- हेक्टर- रोपवाटीका उभारणी – ६० लाख रुपये
– उती संवर्धन प्रयोगशाळा उभारणी – १५० लाख रुपये

अर्ज करण्यासाठी www.magnetadb.com या संकेस्थळावर भेट द्या

Leave a Comment