50 लाख 95 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये जमा

50000 Subsidy List मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला 50 लाख 95 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये जमा

50 हजार अनुदान List ज्या शेतकऱ्यांनी २०१७ ते २०२० मध्ये कोणतीही २ वर्षे नियमित पीक कर्जफेड केली आहे, त्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून जाहीर केलेला ५० हजार रुपयांचा निधी गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. प्रोत्साहनपर लाभ एकूण ९ लाख ४३ हजार शेतकऱ्यांना मिळणार असून हे प्रमाण कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अवघे २२ टक्के आहे.

आघाडी सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना आणली होती. त्याचा लाभ ३१ लाख ७१ हजार शेतकऱ्यांना २० हजार २४३ कोटी इतका देण्यात आला. सरकारने त्यासाठी ५० हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्याचे जाहीर केले होते. शिंदे-फडणवीस सरकारने आता त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे. त्याचा प्रारंभ गुरुपासून होत आहे. ९ लाख ४३ हजार पात्र लाभधारक यामध्ये आहेत. आत्तापर्यंत ७ लाख १५ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे.

५० हजारांसाठी १६ लाख खाती होल्डवर ५० हजार रुपयांच्या लाभासाठीची १६ लाख कर्जखाती विविध कारणांनी होल्डवर ठेवली आहेत. एक वर्ष नियमित कर्जफेड करणे, खाते क्रमांक चुकीचा असणे, विविध कार्यकारी सेवा संस्थेचा चुकीचा सभासद क्रमांक देणे, चुकीचा सीआयएफ क्रमांक असणे अशा कारणांनी अनेक शेतकरी प्रोत्साहन लाभास मुकण्याची शक्यता आहे.

Leave a Comment